कळंब–छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब व यशवंत चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१२ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व थोर नेते यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हनुमंत माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रासेयो विभागप्रमुख डॉ. मनीषा कळसकर,प्रा.अभिमान ढाणे तसेच आयक्यूएसी विभागप्रमुख डॉ.अनिल जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा व समाजकार्यातील योगदानाचा आढावा घेतला.त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी समाजासाठी कार्य करण्याची भावना जोपासावी,असे आवाहन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
जि.प. प्राथमिक शाळा तांदुळवाडी येथे स्वयंशासन दिन उत्साहात
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांच्या पुतळ्यास शिक्षण महर्षी महाविद्यालयात अभिवादन
आढाळा शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन;विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांना दिली प्रेरणा