March 4, 2026

संत मदर तेरेसा विद्यालयाची दैदिप्यमान कामगिरी;यश वाघमारे जिल्ह्यात दुसरा,तालुक्यात पहिला!

  • कळंब – कळंब तालुक्यातील संत मदर तेरेसा माध्यमिक विद्यालय,ता.कळंब जि.धाराशिव या विद्यालयाने National Means-cum-Merit Scholarship 2025 परीक्षेत घवघवीत यश संपादन करत गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
    विद्यालयातील एकूण 34 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी तब्बल 29 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून विद्यालयाच्या उत्कृष्ट शैक्षणिक दर्जाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
    या परीक्षेत यश महेश वाघमारे याने धाराशिव जिल्ह्यात दुसरा क्रमांक तर कळंब तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
    यासोबतच देवयानी दत्ता पवार, अक्षरा दत्ता इके,आर्या दिपक धावरे,पंकजा गजेंद्र जवंजाळ, श्रेया बालाजी गुंड,श्रीलेश मधुकर बाकले,विराज विजयकुमार मस्के, सुहान लतीफ शेख,समर्थ विलास डिकले,श्रद्धा सुदर्शन कोळपे, यशवर्धन दत्ता शेवडे,रूही बोद्धीसत्व वाघमारे,गायत्री संतोष पुरी,प्रांजली नामदेव झाडे,मयंक संजीवन सरवदे,देव उमेश शिंदे, ऋतुराज ज्ञानेश्वर गायकवाड, समृद्धी शंकर डोळे,सार्थक कल्याण कांबळे,सौरभ समाधान कोठावळे,अश्विन अविनाश कांबळे,अस्मिता सतीश काळे, संस्कृती धर्मराज काळे,अंकिता अरुण माळी,रुद्रप्रताप सुरेश शिंदे,सृष्टी दत्तात्रय तनपुरे,सुबोध अश्रूबा राऊत व सोनाक्षी दीपक धावारे या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले.
    या यशामुळे विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून विद्यार्थी,पालक व शिक्षकवर्गामध्ये उत्साह संचारला आहे.
    संस्थेचे प्रमुख अंगदराव चव्हाण, विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.ए. चव्हाण,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,ग्रामस्थ व पालक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
    विद्यालयाचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन,विद्यार्थ्यांची अथक मेहनत व पालकांचा भक्कम पाठिंबा यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
error: Content is protected !!