देहू – राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देहू नगरीत अभंग संपदा या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.गाथा मंदिर रोड येथील अभंग मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ (अण्णा) तोडकर,प्राचार्य गोविंद बिराजदार,प्राचार्य वेंकट अणिगुंटे तसेच जागतिक स्तरावरील पाणी संशोधक व सामाजिक कार्यकर्ते विलास कुलकर्णी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला आणि अभंग संपदा ग्रंथाचे विधिवत लोकार्पण करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात विश्वनाथ अण्णा तोडकर यांनी देहू या पवित्र स्थळी ग्रंथप्रकाशन झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. “अभंग संपदा देहूगावी प्रकाशित झाल्याने ती अधिक पावन झाली आहे. पुढील लोकार्पण सोहळा धाराशिव जिल्ह्यात व्हावा व अभंग रचना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्राचार्य वेंकट अणिगुंटे, प्राचार्य गोविंद बिराजदार, विलास कुलकर्णी तसेच प्रकाशिका गौरी मॅडम (पुणे) यांनीही मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
काव्यप्रेमी महाराष्ट्र व उत्तरदायित्व एनजीओ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फाउंडेशनचे अध्यक्ष भूमिपुत्र वाघ, सचिव श्रुतीताई डिंबळे, खजिनदार विलास कुलकर्णी तसेच सदस्य नागेश गायकवाड व हरिचंद्र ढाकणे यांनी आयोजनाची जबाबदारी सांभाळली. ग्रंथाचे संपादक भूमिपुत्र वाघ, सुधाकर झिंगाडे व कमलाकर भोसले यांच्या बौद्धिक परिश्रमातून साकारलेल्या या ग्रंथातील साहित्यिकांना प्रमुख अतिथींच्या हस्ते ट्रॉफी व अभंग संपदाचा संच देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ‘अभंगवाणी साहित्य संमेलन’ आयोजित करून महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांनी आपल्या अभंग रचना सादर केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भूमिपुत्र वाघ यांनी केले,तर आभारप्रदर्शन कमलाकर भोसले यांनी केले. भक्ती,साहित्य आणि संस्कृतीचा संगम साधणारा हा सोहळा देहू नगरीत उत्साहात संपन्न झाला.
More Stories
अन्याय व भ्रष्टाचाराविरोधात पुण्यात महाविकास आघाडीची भव्य बाईक रॅली – प्रभाग १७ मध्ये परिवर्तनाचा हुंकार
पुण्यातील महार वतन जमीन घोटाळा उघड! पीडित दलित शेतकऱ्यांची ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्याकडे धाव
शिंदे सरकार प्रतिष्ठानाच्या संकेत शिंदे यांची पुणे जिल्हा संघटकपदी निवड