February 17, 2026

‘माय भारत’ मेगा पदयात्रेतून शिवजयंतीचा जागर

  • १९ फेब्रुवारीला धाराशिवमध्ये भव्य आयोजन
  • धाराशिव (जिमाका) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शौर्य, कर्तृत्व आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी १९ फेब्रुवारी २०२६ रोजी धाराशिव येथे ‘My Bharat (Mera Yuva Bharat)’ अंतर्गत मेगा पदयात्रा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
    विभागीय आयुक्त,छत्रपती संभाजीनगर यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविण्यात येत असून जिल्हा प्रशासन,सर्व शैक्षणिक संस्था,एनएसएस,एनसीसी,‘माय भारत’तसेच विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम पार पडणार आहे.
    धाराशिव येथील श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथून सकाळी ७.०० वाजता पदयात्रेला प्रारंभ होणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले चौक, सुनील प्लाझा मार्गे नगरपरिषद रोड,जिल्हा परिषद,शासकीय विश्रामगृह,पोलीस अधीक्षक कार्यालय,कोहिनूर हॉटेल,जुने दूरदर्शन केंद्र,समता नगर,श्री चित्रमंदिर गोरें कॉम्प्लेक्स,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पदयात्रेचा समारोप होईल.
    समारोपस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. युवक-युवतींच्या उत्स्फूर्त सहभागातून शिवजयंतीचा उत्साह अधिक दिमाखात साजरा होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
error: Content is protected !!