कळंब–तालुक्यातील पानगाव येथे अफूच्या अवैध लागवडीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून येरमाळा पोलीस ठाणे यांनी धाडसी कारवाई करत सुमारे ४.५ किलो वजनाचे अफूचे पीक जप्त केले आहे. बाजारभावानुसार या मुद्देमालाची अंदाजे किंमत १,४१,१५० रुपये असल्याचे सांगण्यात आले.या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पानगाव शिवारातील शेत गट क्रमांक १४१/४ मध्ये अफूची बेकायदेशीर शेती सुरू असल्याचे समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव यांनी पथकासह घटनास्थळी धाड टाकली. तपासणीदरम्यान बाबासाहेब वाघमारे यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात अफूची झाडे आढळून आली. घटनास्थळी पंचनामा करून संपूर्ण कारवाईची व्हिडिओग्राफी करण्यात आली.आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर लागवड करू नये,अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल,असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल भोजगुडे, पोलीस उपनिरीक्षक आवारे, तानाजी काळे,पो.कॉ.किरण शिंदे, रवींद्र कांबळे,निलेश जाधव यांच्यासह कर्मचारी सहभागी होते.
More Stories
अल्प पेन्शनवाढीसाठी EPS-95 सेवानिवृत्तांचा आवाज बुलंद; केंद्रीय श्रम मंत्र्यांना निवेदन
बातमी डिलीट करण्यासाठी पत्रकाराला धमकी;कळंबमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
गांधी विचार संस्कार परीक्षेत मोहेकर महाविद्यालयाची उज्ज्वल परंपरा कायम