कळंब – आदर्श इंग्लिश स्कूल, कळंब (मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित) येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात व दिमाखात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.नवनाथ करंजकर होते.प्रमुख पाहुणे म्हणून कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले, उपशिक्षणाधिकारी सुशील फुलारी तसेच प्रा.डॉ.बाळकृष्ण भवर उपस्थित होते. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य,शेतकरी नृत्य, लोकगीते,एकांकिका आदी विविध सांस्कृतिक सादरीकरणांमधून उपस्थितांची मने जिंकली.विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा देखणा आविष्कार पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या प्राचार्या टी.एस.सय्यद व सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाला संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर तोडकर, संस्थेचे आधारस्तंभ शंकराव करंजकर,सुरेखाताई करंजकर, नवनिर्वाचित नगरसेवक भूषण करंजकर,गोरक्ष करंजकर, प्रतीक गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे कोषाध्यक्ष गणेश करंजकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव ज्ञानेश्वर तोडकर यांनी मानले. या प्रसंगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
“आंबेडकर जयंतीनिमित्त करुणेचा उपक्रम;मुक्या प्राण्यांसाठी पाण्याच्या टाक्यांची उभारणी”
गुरु-शिष्य नात्याचा जिवंत आदर्श;परदेश दौऱ्यानंतर गुरुवर्य डॉ.मोहेकर यांचा शिष्याकडून भावपूर्ण सत्कार
आर.एस.पोल्ट्री फार्ममध्ये सदस्यांचा गौरव;रस्ते प्रश्न सोडवण्याचे आश्वासन