कळंब–कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघाच्या कळंब आगाराची नवीन कार्यकारिणी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचा व सोडविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. संघटनेच्या अध्यक्षपदी रविकांत शिंदे यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी धीरज वाघमारे, सचिवपदी नितीन गायकवाड,तर कोषाध्यक्षपदी प्रशांत गायकवाड यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष म्हणून संतोष कांबळे, प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्रकाश पाटेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटकपदी विलास थोरात व शिवराम राजन,सहसंघटक म्हणून अंकुश गायकवाड आणि कैलास आगे यांची जबाबदारी सोपविण्यात आली.महिला प्रतिनिधी म्हणून निवेदिता रणदिवे,पुष्पा शेंडगे आणि लता खडबडे यांचा समावेश आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून रत्नाकर जोशी,तानाजी गांगणे,लक्ष्मण जानराव,जानदेव घोट व विभीषण धीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सदस्य म्हणून सुबोध रणदिवे,नारायण कसबे,किशोर बांगे आणि मिनाज शेख यांची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून कास्ट्राईब संघटना एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी व त्यांच्या हक्कांसाठी ठाम भूमिका घेणार असल्याचे नूतन पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
More Stories
आर.एस.पोल्ट्री फार्ममध्ये सदस्यांचा गौरव;रस्ते प्रश्न सोडवण्याचे आश्वासन
परमभक्तीनेच भगवंत प्राप्त – ह.भ.प.संदीपान महाराज हसेगांवकर
‘जय हनुमान तालीम संघा’चा सामाजिक उपक्रम;हनुमान जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद