कळंब – स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कळंब येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व व्यापारी असोसिएशन मार्केट यार्डच्या वतीने यंदा शिवजन्मोत्सव सोहळा २०२६ भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. विविध पारंपरिक,सांस्कृतिक आणि आकर्षक कार्यक्रमांनी हा सोहळा उत्साहात रंगणार आहे. शिवजयंती सोहळा सुरू झाल्यापासून बाजार समितीत दरवर्षी शिस्तबद्ध आणि देखणी मिरवणूक काढण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही भव्य नियोजन करण्यात आले असून, कळंब शहरात पाहण्याजोगा सोहळा अनुभवता येणार आहे. यंदाच्या कार्यक्रमात उज्जैन येथील जहाज पथक व डमरू पथक, केरळ येथील झेंडा पथक, देवदेवतांच्या वेशभूषेतील पारंपरिक कलाकार सहभागी होणार आहेत.कोल्हापूर येथील पारंपरिक दिमडी संच विशेष आकर्षण ठरणार असून, शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करणारे कलाकार,महानाद ढोल-ताशा पथक,लेझीम पथक तसेच इतर पारंपरिक कलावंतांचा सहभाग सोहळ्याची रंगत वाढवणार आहे. संपूर्ण परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात येणार असून,उत्सवी वातावरण निर्माण होणार आहे.विविध सांस्कृतिक पथकांना आमंत्रित करून त्यांच्या कलेचा सन्मानही करण्यात येणार आहे. हा भव्य उत्सव सर्व शिवभक्तांसाठी खुला ठेवण्यात आला असून,महाराष्ट्रातील विविध शहर,गाव व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
More Stories
अल्प पेन्शनवाढीसाठी EPS-95 सेवानिवृत्तांचा आवाज बुलंद; केंद्रीय श्रम मंत्र्यांना निवेदन
बातमी डिलीट करण्यासाठी पत्रकाराला धमकी;कळंबमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
गांधी विचार संस्कार परीक्षेत मोहेकर महाविद्यालयाची उज्ज्वल परंपरा कायम