May 21, 2026

शिवसेना महायुतीचा धाराशिवमध्ये ऐतिहासिक विजय; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अजित पिंगळे यांचे अभिनंदन .

  • मुंबई (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व व ऐतिहासिक विजयानंतर शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घवघवीत यशाबद्दल समाधान व्यक्त करत सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते आणि मतदारांचे अभिनंदन केले.
    यावेळी त्यांनी धाराशिव जिल्हाप्रमुखपदी नियुक्त झालेल्या अजित पिंगळे यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे आणि विकासाचा विचार प्रत्येक गावात व प्रत्येकाच्या मनामनात पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करावे,असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
    धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीतील विजय हा केवळ राजकीय यश नसून कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांचा,जनतेने दाखविलेल्या विश्वासाचा आणि शिवसेनेच्या विचारधारेचा विजय असल्याचेही शिंदे यांनी नमूद केले.या निकालामुळे जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व अधिक मजबूत झाले असून आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.याप्रसंगी माजी खासदार किरण गायकवाड,आनंत वाघमारे आदींची उपस्थिती होती.
    महायुतीच्या या ऐतिहासिक यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला.
error: Content is protected !!