February 10, 2026

संस्थामाता सुमनताई मोहेकर स्मृतिदिन विशेषांकाचे उत्साहात वितरण

  • विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर,कळंब येथे प्रेरणादायी उपक्रम
  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर,कळंब येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेल्या ‘सा. साक्षी पावन ज्योत’च्या संस्थामाता सुमनताई मोहेकर द्वितीय स्मृतिदिन विशेषांकाचे वितरण उत्साहात करण्यात आले.
  • या विशेषांकाच्या माध्यमातून संस्थामाता सुमनताई मोहेकर यांच्या कार्याचा व शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला. उपस्थित शिक्षकांनी विशेषांकाचे स्वागत करून त्यातील विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला.
  • यावेळी मुख्याध्यापक सुभाष लाटे,ज्येष्ठ सहशिक्षक विश्वास जगताप,सहशिक्षक महेंद्र जगताप,दत्तात्रय वळेकर तसेच कार्यकारी संपादक अविनाश घोडके उपस्थित होते.कार्यक्रम प्रसन्न वातावरणात पार पडला.
error: Content is protected !!