February 8, 2026

डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी

  • W कंपनीकडून प्रतिमेस पुष्पहार अर्पण;ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
  • डिकसळ – कळंब तालुक्यातील डिकसळ येथे W कंपनीच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.७ फेब्रुवारी २०२६ रोजी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.यावेळी माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या त्यागमय जीवनकार्याला अभिवादन करण्यात आले.

  • कार्यक्रमाला अजय वाघमारे, सिद्धार्थ वाघमारे,सेवानिवृत्त एलआयसी मॅनेजर गौतम वाघमारे,शरद आदमाने,अतिश वाघमारे,अविनाश वाघमारे,सुरज वाघमारे,भारत गायकवाड,विशाल वाघमारे,गणेश त्रिवेदी,जनक जाधव,बापू वाघमारे,बालाजी वाघमारे यांच्यासह W कंपनीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    यावेळी उपस्थित मान्यवरांनी माता रमाई यांच्या त्याग,संघर्ष आणि समर्पणाच्या जीवनाचा गौरव करत समाजाने त्यांच्या आदर्शांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे वातावरण श्रद्धा व उत्साहाने भारावले होते.
error: Content is protected !!