मोहा – दि.५ फेब्रुवारी २०२६, गुरुवार रोजी ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक सतीश कानगुडे यांच्या हस्ते शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमास उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख प्रा. सुनील साबळे,प्रा.विठ्ठल जाधव, प्रा.रोहित मोहेकर,प्रा.राहुल भिसे, प्रा.अमित जाधव,प्रा.दिग्विजय पाटील,सहाय्यक शिक्षक जनार्दन भामरे,संजय आडणे,अशोक राऊत,सहाय्यक शिक्षिका नीता सोनवणे,प्रा.शेखर गिरी,प्रा.प्रतिभा सावंत,सतीश मडके,प्रा.देवदत्त पाटील,मंगलदास पवार,शैलेश गुरव,ज्योतिराम सोनके, अमितकुमार शर्मा,दिगांबर शिंदे, अंगद आगलावे,परमेश्वर पवार, प्रथमेश साडेकर यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन
मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल मडके यांचा साक्षी पावन ज्योतच्या वतीने सन्मान