पिंपळगाव (डोळा) साक्षी पावनज्योत वृत्तसेवा – कळंब तालुक्यात पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर १९ मंगरूळ व २० हसेगाव (केज) या निर्वाचण गणांमध्ये निवडणुकीची लढत रंगली आहे.दोन्ही गणात उमेदवारांची नावे निश्चित झाल्याने प्रचाराला वेग आला असून मतदारांमध्येही उत्सुकता वाढली आहे. पंचायत समिती कळंब १९ – मंगरूळ निर्वाचण गण – या गणातून तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. भाटशिरपुरा येथील गायकवाड शारदा अच्युत या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे मशाल चिन्ह घेऊन निवडणूक लढवत आहेत.बोर्डा येथील प्रणिता प्रणव चव्हाण या महायुतीकडून कमळ चिन्हावर निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत. तर मंगरूळ येथील तौर सुनंदा नारायण या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आघाडीच्या वतीने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवत आहेत. पंचायत समिती कळंब २० – हसेगाव (केज) निर्वाचण गण – या गणात दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. हसेगाव (के) येथील लक्ष्मी अशोक तोडकर या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तर हावरगाव येथील राणी हरि राऊत या महायुतीकडून धनुष्यबाण चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत. दोन्ही गणांमध्ये प्रचार सभांना सुरुवात झाली असून गावागावांत राजकीय हालचाली वाढल्या आहेत.निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी