February 6, 2026

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात दोन दिवसीय राजर्षी शाहू महाराज व्याख्यानमाला उत्साहात संपन्न

  • कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर,विद्यार्थी विकास विभाग व शिवसेवा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ व २९ जानेवारी २०२६ रोजी दोन दिवसीय राजर्षी शाहू महाराज व्याख्यानमाला उत्साहात संपन्न झाली.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज व संस्थापक कै.नरसिंग (आण्णा) जाधव यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
    दि.२८ जानेवारी २०२६ (बुधवार) रोजी व्याख्यानमालेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
    या सत्रात प्रमुख मार्गदर्शक शिवाजी महाविद्यालय,बार्शी येथील प्रा.डॉ.पंडित महादेव लावंड यांनी राजर्षी शाहू महाराज : सामाजिक क्रांतीचे अग्रदूत या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. त्यांनी शिक्षण,आरक्षण व सामाजिक समतेसाठी राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या क्रांतिकारक कार्याचा सविस्तर आढावा घेतला. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी शाहू महाराजांचे विचार आजही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.
    या सत्राचे अध्यक्ष प्राचार्य प्रा.डॉ. हनुमंत माने होते.
    दि.२९ जानेवारी २०२६ (गुरुवार) रोजी समारोप सत्रात प्रमुख वक्ते प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी (शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब) यांनी आरक्षण धोरण आणि सामाजिक समता:राजर्षी शाहू महाराजांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन केले.त्यांनी आरक्षण धोरणामागील सामाजिक न्यायाची भूमिका स्पष्ट करत शाहू महाराजांच्या निर्णयांची दूरदृष्टी अधोरेखित केली.
    तसेच जनविकास महाविद्यालय, बनसारोळा येथील प्रा.डॉ.मोहन कांबळे यांनी शिक्षणाचा प्रसार आणि बहुजन समाजाचे उत्थान या विषयावर व्याख्यान देत शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या उत्थानासाठी राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या कार्यावर सखोल प्रकाश टाकला.
    या सत्राचेही अध्यक्ष प्राचार्य प्रा. डॉ.हनुमंत माने होते.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रघुनाथ घाडगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.शशिकांत जाधवर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. शफीक चौधरी यांनी मानले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रा. डॉ.हनुमंत माने यांनी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जीवनात अवलंब करण्याचे आवाहन केले.
    या व्याख्यानमालेस प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानमालेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव,विचारप्रवणता व प्रेरणा निर्माण झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. मल्हार शिंदे,संजय शेंडगे,मुरलीधर चोंदे,दत्ता गायकवाड,दत्तात्रय कांबळे तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
error: Content is protected !!