कळंब – सकल विश्वकर्मा समाज बांधवांच्या वतीने खंडोबा मंदिर येथे भगवान विश्वकर्मा जयंती निमित्त शनिवार,दि.३१ जानेवारी २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.यावेळी उपस्थित समाज बांधवांच्या वतीने भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यानंतर दक्षिणमुखी हनुमान भजनी मंडळाच्या वतीने भजन कार्यक्रम घेण्यात आला.भगवान विश्वकर्मा हे सृष्टीचे शिल्पी व आद्य वास्तुकार मानले जातात.त्यामुळे इंजिनिअर,सोनार,सुतार,लोहार तसेच विविध कारागीर वर्ग त्यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या भक्तिभावाने पूजा करतात व जयंती उत्सव उत्साहात साजरा करतात. या कार्यक्रमास दिलीप पांचाळ, अविनाश पांचाळ,समाधान पांचाळ,सुभाष पांचाळ,भारत पांचाळ,रामा पांचाळ,दीपक पांचाळ,अली शेख,महेश पांचाळ, निखिल मोरे,सचिन पांचाळ, मुस्तबिन शेख यांच्यासह भजनी मंडळातील पांडुरंग माळवदे, प्रयागमळा घुले,नंदाबाई पांचाळ, विजया पांचाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सकल विश्वकर्मा समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी