मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. लोकभवन येथे साधेपणाने आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या शपथविधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे,मंत्रिमंडळातील सदस्य, विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तसेच मुख्य सचिव राजेश अग्रवाल,वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी,वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह सुनेत्रा पवार यांचे कुटुंबीय व निमंत्रित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शपथविधी सोहळा साधेपणाने पार पडला.
More Stories
“पायाभूत विकास मंडळ की ‘टेंडर मॅनेजमेंट’ यंत्रणा?” — आमदार कैलास पाटील यांचा सभागृहात खळबळजनक आरोप
२०३५ पर्यंत एसटी ताफा पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा निर्धार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
महाराष्ट्रात गेमिंग व क्रिएटर इकॉनॉमीला चालना;डिजिटल पायाभूत सुविधांवर भर — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस