कळंब – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित (दादा) पवार यांचे दि. २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची वार्ता समजताच कळंब शहरात सर्वत्र शोककळा पसरली.या घटनेमुळे नागरिक,व्यापारी व विविध संघटनांनी तीव्र दुःख व्यक्त केले. या दुःखद घटनेच्या निषेधार्थ व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कळंब शहरातील व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले. शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यासमोर श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.यावेळी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अजितदादा पवार अमर रहे! अशा घोषणा देण्यात आल्या. श्रद्धांजलीपर भाषणात वक्त्यांनी सांगितले की,अजितदादांचा महाराष्ट्राच्या विकासात सिंहाचा वाटा असून त्यांनी स्पष्टवक्तेपणा, कणखर नेतृत्व आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी बांधीलकी जपत कार्य केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र राज्याची न भरून येणारी हानी झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दत्ता तनपुरे,पंचायत समितीचे माजी सभापती भास्करदादा खोसे,उपनगराध्यक्ष लखन गायकवाड,नगरसेवक हर्षद अंबुरे,माजी नगराध्यक्ष बबनराव वाघमारे,शिवाजी गीड्डे,माधवसिंग राजपूत,राहुल हौसलमल,महेश फाटक,गजेंद्र तोडकर,राजाभाऊ बारगुले,शंकर गिलबिले,बालाजी माळी,उत्तरेश्वर चोंदे,श्याम नरवडे, युवराज नखाते,रमाकांत बारटक्के, अभिजीत हौसलमल,विक्रम चोंदे, शकील काझी,रेवण करंजकर, असिफ काझी यांच्यासह कळंब शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान,कळंब शहर पूर्णतः बंद होते.तसेच शासनाने तीन दिवसांचा दुःखवटा जाहीर केल्यामुळे शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
More Stories
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव
कळंब–ढोकी परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार