लातूर – ग्रामदैवत श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.गेल्या ७२ वर्षापासून हा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येत असून या वर्षी महोत्सवाचे ७३ वे वर्ष आहे. गत ७२ वर्षापासून सुरु असलेल्या या महोत्सवाला गौरवशाली परंपरा असून ही परंपरा अधिकाधिक वृंध्दिगत करावी,असे आवाहन देवस्थान समितीचे ज्येष्ठ विश्वस्त तथा माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांनी केले. श्री सिध्देश्वर देवस्थान परिसरात यात्रा महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती.यावेळी ज्येष्ठ विश्वस्त विक्रम गोजमगुंडे बोलत होते.या प्रसंगी विश्वस्त अशोक भोसले,रमेश बिसेन,नरेश पंड्या,सुरेश गोजमगुंडे, बाबासाहेब कोरे,व्यंकटेश हालिंगे यांच्यासह प्रतिष्ठीत नागरिक व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. केवळ लातूर जिल्ह्यातच नव्हे तर परजिल्ह्यासह कर्नाटक राज्यात श्री सिध्देश्वर यात्रा महोत्सव पोहोचला असल्याचे सांगून या यात्रा महोत्सवाला हजारो भाविकांसह नागरीकांचा मोठा सहभाग नोंदवला जात असल्याचे विक्रम गोजमगुंडे यांनी स्पष्ट केले. ७२ वर्षापासून सदर यात्रा महोत्सव भरविण्यात येत असून यात्रा महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी लातूरसह परिसरातील अनेक शिवभक्त आणि सामाजिक कार्यकर्ते आपले योगदान देतात. त्याच बरोबर विश्वस्तही तितक्याच ताकदीने या सर्वांच्या पाठिशी उभे राहून यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी ताकद देत असतात. या महोत्सवाला सिध्देश्वर महाराजांच्या आशिर्वादाने व सर्वांच्या सहकार्याने गौरवशाली परंपरा लाभलेली असून ही परंपरा वृंध्दीगत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे विक्रम गोजमगुंडे यांनी सांगितले.यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी विविध समित्या गठीत होत असून या समितीतील प्रत्येक सदस्यांनी योगदान द्यावे,असे आवाहन ज्येष्ठ विश्वस्त तथा माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांनी केले. यात्रा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी या बैठकीत विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून यामध्ये झेंडा मिरवणूक, यात्रा स्टॉल, पशु व कृषी प्रदर्शन, कुस्ती, भोजन, भजन व किर्तन, अभिषेक, संरक्षक, स्वयंसेवक, विद्यूत व पाणी पुरवठा, प्रसाद वाटप, पास दर्शन, रुद्राभिषेक व महिला स्पर्धा, रचना व सजावट आणि प्रसिध्दी समितीचा समावेश आहे. या समितीच्या माध्यमातून यात्रा महोत्सव यशस्वी करून महोत्सवाची गौरवशाली परंपरा जोपासली जाईल,असा विश्वास या समितीचे प्रमुख व समिती सदस्यांनी व्यक्त केला आहे.
More Stories
खरोसा लेणी येथे माघ पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा;६५ धम्म अनुयायांचा सहभाग
सरसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी .
लातूर महानगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र.१६ (ड) मधून अपक्ष उमेदवार विनोद श्रीहरी कोल्हे मैदानात