September 21, 2026

ज्ञान प्रसार विद्यालय मोहा येथील एकलपालक विद्यार्थ्यांना मिळाली मायेची उब

  • मोहा – महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ (अण्णा) तोडकर,सचिव भूमिपुत्र वाघ व ग्राम शक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाई संस्थेचे अध्यक्ष ज्योतीराम सोनके,उत्तरदायित्व महाराष्ट्र एनजीओ फाउंडेशन, यांच्यावतीने नुकतेच ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार विद्यालय मोहा येथे ग्रामीण भागातील एकल पालक विद्यार्थी, गरीब,गरजू व अनाथ विद्यार्थ्यांना ३० ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. गरीब गरजू विद्यार्थ्यांना सध्या थंडीच्या कडाक्यापासून बचाव करण्यासाठी व मायेची उब मिळण्यासाठी संस्थेने एक छोटासा उपक्रम आयोजित केला होता. सदरील ब्लॅंकेट चे वाटप ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर,प्रशालेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक अविनाश मोरे, पर्यवेक्षक सतीश कानगुडे,ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष ज्योतीराम सोनके,संजय आडणे, सूर्यकांत गुंगे,सुनील साबळे,शेखर गिरी,धनंजय मडके,अशोक राऊत, शैलेश गुरव,मंगलदास पवार, श्रीमती.नीता सोनवणे,प्रतिभा सावंत,कमलाकर शेवाळे,अमित शर्मा,देवदत्त पाटील,अमर पाटील आदींच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश मडके यांनी केले. तर आभार शेखर गिरी यांनी मानले.
error: Content is protected !!