वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी वाटचाल कळंब – यशवंतनगर येथील सेवानिवृत्त लेखापरीक्षक सुरेंद्र शीलवंत यांची कन्या डॉ.प्रज्ञा शीलवंत यांनी वैद्यकीय क्षेत्रातील बी.एच.एम.एस.(होमिओपॅथी) ही पदवी नुकतीच यशस्वीरीत्या प्राप्त केली.त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शहरातील छत्रपती राजश्री शाहू महाराज बचत गटाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभास बचत गटाचे अध्यक्ष सुरेश मस्के,डॉ.शंकर कांबळे,सुनील गाडे,प्रकाश पटेकर,वाघ चौरे,भारतीय बौद्ध महासभेचे सी.आर.घाडगे,डॉ. रघुनाथ घाडगे,अजित शिरसाट, श्रीधर सावंत,बहुजन विकास अधिकारी कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष गायकवाड, महासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाचे तालुकाध्यक्ष प्रा.तात्याराव वाघमारे,ज्येष्ठ साहित्यिक रमेश जगताप,बप्पा शीलवंत,पिताश्री सुरेंद्र शीलवंत,प्राचार्य निळकंठ वाघमारे,सहशिक्षक पाचपेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी डॉ.प्रज्ञा शीलवंत यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वैद्यकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचा त्यांचा संकल्प प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड