March 26, 2026

“शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना भावपूर्ण अभिवादन”

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने तसेच प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.०८ जानेवारी २०२६,गुरुवार रोजी ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन करण्यात आले.
    या कार्यक्रमात पर्यवेक्षक सतीश कानगुडे यांनी शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी गुरुजींच्या शैक्षणिक, सामाजिक व मूल्याधिष्ठित कार्याचा गौरव करण्यात आला.
    कार्यक्रमास उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख प्रा.सुनील साबळे,प्रा.राहुल भिसे,प्रा.विठ्ठल जाधव,प्रा.रोहित मोहेकर,प्रा.अमित जाधव,प्रा. दिग्विजय सिंह पाटील,प्रा.शेखर गिरी,प्रा.देवदत्त पाटील,सहशिक्षक शैलेश गुरव,अनूप पाटील,दिगांबर शिंदे,परमेश्वर पवार यांच्यासह विद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    या अभिवादन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये गुरुजींच्या विचारांचा आदर्श व शिक्षणाविषयीची प्रेरणा अधिक दृढ झाली.
error: Content is protected !!