February 8, 2026

“विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरात मोहेकर गुरुजींच्या स्मरणातून ज्ञानदीप प्रज्वलित”

  • कळंब — ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळ्याचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१ जानेवारी २०२६ रोजी विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरात संस्थापक अध्यक्ष कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    कार्यक्रमास मुख्याध्यापक सुभाष लाटे,सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.शिक्षण क्षेत्रातील मोहेकर गुरुजींच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन नववर्षात अधिक जोमाने शैक्षणिक कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
error: Content is protected !!