February 8, 2026

आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते डॉ.सरोजनीताई राऊत यांच्या दिनदर्शिकेचे उद्घाटन

  • कळंब – श्री लक्ष्मी सेवाभावी संस्था,हासेगाव शिराढोण यांच्या अध्यक्षा तसेच भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षा डॉ. सौ.सरोजनीताई राऊत यांच्या दिनदर्शिकेचे उद्घाटन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.
    ही दिनदर्शिका सक्षम महिला सक्षम कुटुंब या टॅगलाईन खाली जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे. शिराढोण व नायगाव परिसरात सुमारे १० हजार दिनदर्शिकांचे मोफत वितरण सुरू करण्यात आले असून,येत्या काळात परिसरातील नागरिकांना या दिनदर्शिका वितरित केल्या जाणार आहेत.
    मागील अनेक वर्षांपासून डॉ. सरोजनीताई राऊत यांनी ग्रामीण भागातील समस्या जाणून घेत विविध सामाजिक व विकासात्मक विषयांवर सातत्याने कार्य केले आहे.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गोशाळा संघटन,विविध कौशल्याधारित उपक्रमांचे आयोजन,तसेच कळंब–धाराशिव मतदारसंघातील गावांमध्ये पर्यटन विकास,पायाभूत सुविधा उभारणी,बसस्थानक निर्मिती, अल्पसंख्याक विकास,मुख्यमंत्री सहाय्यता निधी,तांडा वस्ती सुधारणा योजना,रस्ते व शेतरस्ते विकास याकरिता त्यांनी निधी आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
    सामाजिक संस्थेच्या वतीने ‘गाव तिथे टाकी’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात दोन हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत. तसेच नमो चषक व डे–नाईट क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणाऱ्या डॉ.सरोजनीताई राऊत यांच्या कार्याचा सविस्तर आढावा या दिनदर्शिकेमधून घेण्यात आला आहे.
    या दिनदर्शिकेच्या निर्मितीसाठी सौ.अर्चनाताई पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब, दत्ताभाऊ कुलकर्णी आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
error: Content is protected !!