February 7, 2026

गणिताची मजा… ज्ञानाची जाणीव! – कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूलमध्ये ‘राष्ट्रीय गणितदिन’ उत्साहात साजरा

  • कळंब – ‘कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल’ येथे राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात,विभिन्न सृजनशील आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.धावारे बंधू यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाला आनंददायी रंगत प्राप्त झाली.
    नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. सुनंदाताई शिवाजी (आप्पा) कापसे यांचा शाळेच्या उपाध्यक्षा सौ.आशा नरहिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यानंतर सांस्कृतिक विभागाचे प्रशांत भोले यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला नाट्यप्रयोग आणि विशाल सर तसेच इयत्ता ३ रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्यप्रयोग सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांचा रॅम्प वॉक हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला.
    यानंतर नगराध्यक्षा सौ.सुनंदाताई कापसे,मुख्याध्यापक पवन कुलकर्णी,सौ.बावीकर,अमीर यांनी विद्यार्थ्यांना गणिताचे महत्त्व, दैनंदिन जीवनातील उपयोग तसेच महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या.
    कार्यक्रमाच्या पुढील सत्रात आउटडोअर गणितीय खेळ, रुबिक्स क्यूब स्पर्धा आणि गणित प्रश्नमंजुषा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला. त्यानंतर रामानुजन यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात आला, ज्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली.
    कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. हेमा स्वामी यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणित विभाग प्रमुख प्रमोद तावदार, प्रतीक उमरदंड,सौ.हेमा स्वामी, सौ.माधुरी जंगम,सौ.पांचाळ,सौ. मांडवकर यांच्यासह शिक्षकवृंद, विद्यार्थी व कर्मचारी यांनी मोठे योगदान दिले.
error: Content is protected !!