कळंब – नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना–भाजप युतीसाठी किंगमेकर ठरलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी (आप्पा) कापसे यांचा भव्य सत्कार कसबा गल्ली येथील गणपती मंदिरामध्ये करण्यात आला.कळंबच्या राजकीय समीकरणांना निर्णायक दिशा देणाऱ्या त्यांच्या नेतृत्वाचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट ह्युमन रिसोर्सेसचे श्रीकांत मडके,राहुल मडके,सुहास धाबेकर,अनिकेत मडके आदी मान्यवर उपस्थित होते. कळंब शहराच्या विकासात सकारात्मक बदल घडविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाला कार्यकर्त्यांसह नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी