तुळजापूर– उमरगा–लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या उपस्थितीत ओबीसी प्रवर्गातील शिक्षकांच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांवर सखोल व सकारात्मक चर्चा पार पडली.राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाच्या शिष्टमंडळाने राज्य सरचिटणीस संतोष भोजने व जिल्हाध्यक्ष अनंत फुलसुंदर यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. या बैठकीत पदोन्नती,सेवाज्येष्ठता, आरक्षण अंमलबजावणी, न्यायालयीन निर्णयांमुळे निर्माण झालेल्या अडचणी तसेच शिष्यवृत्ती योजनांसह ओबीसी शिक्षकांच्या हक्कांबाबत महत्त्वाचे मुद्दे गांभीर्याने मांडण्यात आले. यावेळी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक अशोकराव खडके यांचा आमदार स्वामी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. चर्चेदरम्यान आमदार स्वामी यांनी उपस्थितांच्या भावना मनापासून ऐकून घेतल्या व शासनस्तरावर संबंधित प्रश्न मांडून योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.या बैठकीत जिल्हा सचिव अशोक खडके,शामराव कोयले,नानासाहेब कवडे,दीपक हजारे,गोविंद कुंभार, विक्रम पाचांगी,परमेश्वर साखरे, व्यंकट क्षीरसागर,पंकज काटकर, शरद सोनटक्के व अवताडे सर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या फलदायी चर्चेमुळे ओबीसी शिक्षकांमध्ये समाधान व आशेचे वातावरण निर्माण झाले असून लवकरच ठोस निर्णय होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
More Stories
न्यायापासून वंचित असलेल्यांना न्याय मिळावा – न्या.प्रसन्न वराळे
पी एम श्री कन्या प्रशाला तुळजापूरच्या मुलींचा जिल्हा क्रीडांगणावर झंकार — तीन संघ विभागीय पातळीवर दाखल!
मानसिक आरोग्य आणि समुपदेशन कौशल्य विकासासाठी टीसचा स्तुत्य उपक्रम – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार