भाटशिरपुरा–दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी कै.भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय, भाट शिरपुरा येथे “खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे” अशी मानवता व बंधुभावाची शिकवण देणारे थोर साहित्यिक व भारतीय स्वातंत्र्यसैनिक परम पूज्य साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने) यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश टेकाळे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक एस एस.डिकले यांनी केले. त्यानंतर परम पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सहशिक्षक एच.ए.पानढवळे यांनी आपल्या भाषणातून साने गुरुजी यांच्या सामाजिक, शैक्षणिक व स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची माहिती दिली. तसेच याच दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्त्व व ग्राहकांचे हक्क याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे सचिव बाळकृष्ण धस, सहशिक्षक श्री. एस. जी. सूर्यवंशी, शिक्षकेत्तर कर्मचारी विनायक शिंदे व विनोद चाळक तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहशिक्षक बी.व्ही.ओव्हाळ यांनी केले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी