कळंब – राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांनी दिलेल्या स्वच्छता व सामाजिक जागृतीच्या संदेशाला अभिवादन करत वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गाडगेबाबा महाराजांनी समाजस्वच्छतेचा दिलेला विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा व स्वच्छतेचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून पटावे,या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षणार्थींनी कॉलेज कॅम्पसमध्ये कचरा संकलन, परिसर स्वच्छता तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करत गाडगेबाबांना भावपूर्ण अभिवादन केले. या उपक्रमासाठी भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे,प्रा.श्रीकांत पवार,निदेशक अविनाश म्हेत्रे, निदेशक राजकुमार शिंदे,निदेशक बालाजी रामरुळे,आदित्य गायकवाड, विनोद कसबे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्वच्छता मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, जबाबदारीची जाणीव व राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या विचारांचे महत्त्व अधिक ठळकपणे अधोरेखित झाले,असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर