September 24, 2026

ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन

  • मोहा– ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१८ डिसेंबर २०२५,गुरुवार रोजी ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय,मोहा ता.कळंब येथे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (अण्णा) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
    या कार्यक्रमावेळी शाळेतील सहशिक्षक कमलाकर शेवाळे,चिलवंत राजाभाऊ,श्रीमती उषा पांचाळ,धनंजय परजने, ज्ञानोबा टोपे यांच्यासह प्रशालेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
    गुरुजींच्या शैक्षणिक कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी आचरणात आणावा, असा संदेश यावेळी देण्यात आला. या अभिवादन कार्यक्रमामुळे शाळेत प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
error: Content is protected !!