March 26, 2026

लोकविकास मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ तोडकर यांच्या समाजकार्याचा गौरव

  • धाराशिव – लोकविकास मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांच्या सामाजिक कार्याचा समावेश लोकमतच्या “आयकॉन ऑफ धाराशिव” या अत्यंत प्रतिष्ठित कॉफी टेबल बुकमध्ये करण्यात आला आहे.ही बाब केवळ मा. तोडकर यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्यासाठी अभिमानाची व गौरवाची ठरली आहे.
    समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास,न्याय व माणुसकी पोहोचविण्याच्या उद्देशाने विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांनी सातत्यपूर्ण,निःस्वार्थ व प्रेरणादायी कार्य केले आहे. सामाजिक बांधिलकी,लोककल्याणाची तळमळ,सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबतची संवेदनशीलता आणि समाजपरिवर्तनासाठीची दूरदृष्टी ही त्यांच्या कार्याची खरी ओळख मानली जाते.
    विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी युवकांना सकारात्मक दिशा दिली,गरजू व वंचित घटकांना आधार दिला तसेच समाजात परिवर्तनाची ज्योत तेवत ठेवली.त्यांच्या या प्रभावी कार्याची लोकमतसारख्या नामांकित माध्यमातून दखल घेण्यात येणे,ही त्यांच्या कार्याच्या पोच, परिणामकारकता व विश्वासार्हतेची ठोस पावती असल्याचे मानले जात आहे.
    या गौरवपूर्ण प्रसंगी प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांच्या आजवरच्या समाजकार्याला मानाचा मुजरा अर्पण करण्यात आला.त्यांच्या पुढील सामाजिक, संघटनात्मक व लोककल्याणकारी वाटचालीस उत्तरोत्तर यश लाभो, त्यांचे कार्य अधिक व्यापक होवो आणि त्यांच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा व ऊर्जा मिळो,अशा मनःपूर्वक शुभेच्छा व मंगलकामना व्यक्त करण्यात आल्या.
error: Content is protected !!