कळंब — विशाखापट्टणम येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय इनलाईन हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड झालेल्या कु. आराध्या प्रदीप धस हिने राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कळंब तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल कळंब येथील तिच्या निवासस्थानी दोस्ती ग्रुपच्या वतीने तिचा व तिच्या पालकांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी सतिश टोणगे,संदीप भैय्या बाविकर,प्रताप मोरे, पार्श्वनाथ पाटील,इंजि.प्रकाश धस, बाळासाहेब धस तसेच पालक इंजि.प्रदीप धस उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी आराध्याच्या कर्तृत्वाचे कौतुक करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कु.आराध्या धस ही पिंपळगाव डोळा (ता.कळंब,जि.धाराशिव) येथील रहिवासी असून,आपल्या गावातून राष्ट्रीय पातळीवर इनलाईन हॉकी स्पर्धेत सहभागी होणारी ती एकमेव खेळाडू ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी