धाराशिव – भारतीय संविधानाचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघ शाखा धाराशिवच्या वतीने दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात संघटनेचे अशोक बनसोडे,प्रभाकर बनसोडे आणि दिलीप वाघमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमावेळी संघटनेचे प्रदिप शिंदे,रमाई फाऊंडेशनचे पृथ्वीराज चिलवंत,श्रीकांत चिलवंत,रवि कांबळे,यु.व्ही.माने,विजय गायकवाड,वाहूळकर साहेब, राजन माने,बलभीम कांबळे, अविनाश गायकवाड,सुनिल बनसोडे,बाळासाहेब माने,राजेंद्र धावारे आदी मान्यवर उपस्थित होते. महापुरुषांच्या विचारांना विनम्र सलाम आणि सामाजिक समतेच्या मूल्यांची पुनःप्रतीती घडवणारा हा अभिवादन सोहळा आदर व श्रद्धेच्या वातावरणात पार पडला.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक