February 10, 2026

ऑल इंडिया संपादक संघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी अजय लोंढे

  • पुणे – ऑल इंडिया संपादक संघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी साप्ताहिक पुणे मोर्चा वृत्तत्राचे संपादक अजय लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष स्वप्निल कांबळे यांनी ही नियुक्ती केली आहे. अजय लोंढे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करित असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.अजय लोंढे संघाचे नियमांचे अधिन राहून संपादक संघ बळकटीकरिता कार्य करणार असून संघटनेची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करणार आहेत.भारत देशातील आंबेडकरी आणि बहुजन चळवळीत कार्यरत असलेल्या वृत्तपत्रांची देश पातळीवरील ऑल इंडिया संपादक संघ ही राष्ट्रीय संघटना असून पुणे जिल्हातील पत्रकार तथा संपादक अजय लोंढे यांची निवड करण्यात आली आहे.त्यांच्या नियुक्ती बद्दल सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
error: Content is protected !!