February 8, 2026

श्री शिवाजी विधी महाविद्यालय,परभणी येथे संविधान दिन उत्साहात साजरा

  • उद्देशिका वाचन,संविधान चर्चा आणि जागरूकतेचा संदेश
    परभणी – श्री शिवाजी विधी महाविद्यालय,परभणी येथे संविधान दिन उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.एल.धर्मापुरीकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या उद्देशिका वाचनाने झाली.उद्देशिकेचे वाचन प्रा.डॉ. जवंजाळ यांनी केले व सभागृहातील सर्वांनी सामूहिकरित्या उद्देशिकेचे वाचन करून भारतीय संविधानाप्रती आदर व्यक्त केला.
    विद्यार्थ्यांच्या वतीने करण पाईकराव यांनी मनोगत व्यक्त करताना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकारले गेले व २६ जानेवारी १९५० रोजी अंमलबजावणी झाल्याची माहिती दिली.तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध विचारांचा उल्लेख करत “कलम ३२ हे भारतीय संविधानाचा आत्मा आहे” यासारख्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला.
    अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. धर्मापुरीकर यांनी राज्य धोरणातील मार्गदर्शक तत्वे, महत्वाची कलमे आणि भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य याबद्दल अत्यंत थोडक्यात पण प्रभावी मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थित सर्वांनी संविधान विषयक मुक्त चर्चा केली.
    कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ.आर.बी.देशमुख यांनी केले.
    या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. आर.बी.देशमुख,प्रा.डॉ.ए.आर. देशमुख,सर्व प्राध्यापकवर्ग, प्राध्यापकेत्तर कर्मचारी तसेच एनएसएस स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ.प्रकाश दादा सोळंके,सचिव आ.सतीश भाऊ चव्हाण,तसेच महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य चंद्रशेखर नखाते,गोविंद कदम,मगदूम मोहीउद्दीन संतोष बोबडे,ॲड.दीपक देशमुख,ॲड. अशोक शिंदे,संतोष इंगळे यांनी संविधान दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!