मोहा – संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने तसेच प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोहा येथे दि.२५ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘संविधानाचा जागर’ हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अनुलोम संस्थेच्या अंजली कदम यांनी संविधानाविषयी सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना संविधानातील हक्क, स्वातंत्र्य आणि कर्तव्ये यांची सविस्तर माहिती देत आदर्श राष्ट्रनिर्मितीत संविधानाचे महत्व अधोरेखित केले.आजच्या काळातील विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तरुणांनी सज्ज राहिले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांनी भूषविले. पर्यवेक्षक सतीश कानगुडे, उच्च माध्यमिक विभागाचे सुनील साबळे, नागरिकशास्त्र विद्यार्थी समूहाचे मार्गदर्शक दिग्विजय पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता झोरी हिने केले. प्रगती जाधव हिने मान्यवरांचा परिचय करून दिला तर भाग्यश्री जाधव हिने आभार मानले. विद्यार्थिनी अंजली कोष्टी हिने संविधानावर आधारित कविता सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. तसेच प्रा. चंद्रशेखर गिरी यांनी विद्यार्थ्यांना संविधानाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन
ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन