June 24, 2025

धाराशिव जिल्हा पोलीस नामा

  • “मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई.”
  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.02 डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 115 कारवाया करुन 82,500 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई .”
  • मा. पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल शनिवार दि.02.12.2023 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 12 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला सुमारे 194 लि. गावठी दारु, देशी विदेशी दारुच्या 22 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर मद्य जप्त करुन यांची एकत्रीत किंमत अंदाजे 19,180 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 12 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
  • 1)भुम पो. ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. वंजारवाडी, ता. भुम जि. धाराशिव येथील- दादा बप्पा काळे, वय 45 वर्षे, हे 15.00 वा. सु. वंजारवाडी येथे राहते घराचे समोर अंदाजे 800 किंमतीची 10 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • 2)नळदुर्ग पो. ठाणेच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. निलेगाव, ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील-इंद्रजित अनिल भालेराव, वय 40 वर्षे, हे 14.15 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या समोर अंदाजे 800 किंमतीची 10 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील- शिवाजी शामराव कदम, वय 62 वर्षे, हे 18.15 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या समोर अंदाजे 1,000 किंमतीची 10 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर मारखारेी तांडा किलज, ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील- शिवाजी निल्लाप्पा पवार, हे 19.30 वा. सु. मारखेड तांडा किलज येथे अंदाजे 630 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 09 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
  • 3)मुरुम पो. ठाणेच्या पथकाने 4 ठिकाणी छापे टाकले. आनंदनगर, ता. उमरगा जि. धाराशिव येथील-हरी राजु वाघमारे, वय 64 वर्षे, हे 17.20 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या समोर अंदाजे 2,000 किंमतीची 20 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर येणेगुर ता. उमरगा जि. धाराशिव येथील- प्रफुल विठ्ठल गायकवाड, वय 53 वर्षे, हे 15.20 वा. सु. येणेगुर येथे अंदाजे 2,000 किंमतीची 20 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर भिमनगर, ता. उमरगा जि. धाराशिव येथील- युनुस बाशमियॉ भाजीवाले, वय 48 वर्षे, हे 18.30 वा. सु. भिमनगर येथे
  • पत्र्याचे शेडसमोर अंदाजे 2,400 किंमतीच्या 24 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर अचलेर ता. लोहारा जि. धाराशिव येथील- तिपण्णा शंकर राघोजी, वय 48 वर्षे, हे 19.30 वा. सु. अचलेर येथील जाणारे रोड लगत आपले राहते घराचे समोर अंदाजे 2,100 किंमतीच्या 21 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • 4)येरमाळा पो. ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. कडकनाथवाडी, ता. वाशी जि. धाराशिव येथील- प्रदीप मसु शिलवंत, वय 32 वर्षे, हे 21.30 वा. सु. आपल्या किराणादुकाना समोर कडकनाथवाडी येथे अंदाजे 1,640 किंमतीची 18 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • 5)आंबी पो. ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. रत्नापुर ता. परंडा जि. धाराशिव येथील- अशोक तात्या खताळ, हे 21.15 वा. सु. रत्नापुर येथे हॉटेल हनुमान पत्रयाच्या आडोशाला अंदाजे 910 ₹ किंमतीची देशी विदेशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
  • 6)तामलवाडी पो. ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. सुरतगाव, ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील- भिमराव रामचंद्र सुरते, वय 70 वर्षे, हे 20.05 वा. सु. सुरतगाव ते पिंपळा जाणारे रोडलगत चंद्रा वायनरी चे बाजूला अंदाजे 900 किंमतीची 10 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • 7)ढोकी पो. ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. पळसप ता. जि. धाराशिव येथील- शरद फुलचंद लाकाळ, वय 35 वर्षे, हे 18.40 वा. सु. पळसप ते मुरुड रोडलगत येथे अंदाजे 4,000₹ किंमतीची 50 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • लोहारा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान लोहारा पोलीसांनी दि.02.12.2023 रोजी12.05 ते 13.46 वा. सु. लोहारा पो. ठा.हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)माणिक जगनाथ माळसदकर, वय 42 वर्षे, रा. लोहारा, ता. लोहारा जि. धाराशिव हे 13.46 वा. सु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक लोहारा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,190 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. तर 2)किरण धोंडीराम माळवदकर, वय 52 वर्षे, रा. लोहारा, ता. लोहारा जि. धाराशिव हे 12.05 वा. सु. बी.एस.एन.एस ऑफीस समोर रोडवर लोहारा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,250 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये लोहारा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • उमरगा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.02.12.2023 रोजी 15.30 वा. सु. उमरगा पो. ठा.हद्दीत उमरगा चौरस्ता येथे पुलाचे खाली छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)बिराप्पा दत्तु सुर्यवंशी, वय 35वर्षे, रा. जकेकुर, ता. उमरगा जि. धाराशिव हे 15.30 वा. सु. उमरगा चौरस्ता पुलाचे खाली कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,200 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • मुरुम पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान मुरुम पोलीसांनी दि.02.12.2023 रोजी 17.30 वा. सु. मुरुम पो. ठा. हद्दीत सुंदरवाडी शिवारतील विठ्ठलसाई साखर कारखान्याचे पाठीमागे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)अजय श्रीमंत गायकवाड, वय 28 वर्षे रा. नेहरुनगर मुरुम, 2) गुरुनाथ बसवण्णा मोरखंडे, वय 60 वर्षे, रा. शास्त्रीनगर मुरुम, 3) बशीर इस्माईल कागदी, वय 45 वर्षे, रा. कागदगल्ली मुरुम, ता. उमरगा,4) नितीन रावण देशपांडे वय 32 वर्षे, रा. सालेगाव, ता. लोहारा जि. धाराशिव हे 17.30 वा. सु. सुंदरवाउी शिवारातील विठ्ठलसाई साखर कारखानृयाचे पाठीमागे तिरट जुगाराचे साहित्यासह एकुण 2,400 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • आनंदनगर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंदनगर पोलीसांनी दि.02.12.2023 रोजी 12.30 वा. सु. आनंदनगर पो. ठा. हद्दीत नगर परिषद जवळील नाट्य ग्रहाजवळ धाराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)प्रदिप विठ्ठलराव इंगळे, वय 48 वर्षे, रा. शिक्षक कॉलनी बार्शी नाका धाराशिव ता. जि. धाराशिव हे 12.30 वा. सु. नगर परिषद जवळील नाट्य ग्रहाजवळ धाराशिव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 7,10 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
  • वाशी पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)संतोष मधुकर शिनगारे, वय 40 वर्षे, रा. पारा, ता. वाशी जि. धाराशिव, 2) दत्तात्रय निवृत्ती भराटे, वय 38 वर्षे, रा. पारा ता. वाशी जि. धाराशिव या दोघांनी दि.02.12.2023 रोजी 15.30 ते 16.00 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे क्रुजर क्र एमएच 13 डी.ई. 9304 व क्रुजर क्र एमएच 13 डी. ई. 3197 ही वाहने वेगवेगळ्या दोन ठिकाणी पारा येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना वाशी पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये वाशी पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • कळंब पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-महादेव मनोहरराव घुले, वय 60 वर्षे, रा. दत्तनगर कळंब ता. कळंब, जि. धाराशिव यांचे तांदुळवाडी रोड लगत रुणवाल बिल्डींग डिकसळ ता. कळंब येथील सुपारीचे गोडवुनचे शटरचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.01.12.2023 रोजी 05.00 ते दि. 02.12.2023 रोजी 07.00 वा. सु.तोडून आत प्रवेश करुन गोडावून मधील सुपारीचे 45 पोते एकुण 16,60,125 ₹ किंमतीचा माल चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महादेव घुले यांनी दि.02.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 454, 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- अब्दुल गफार गुलाम रसुल शेख, वय 48 वर्षे, रा. खॉजानगर गल्ली धाराशिव यांचे मार्केट यार्ड येथील ऑफीस समोर धाराशिव येथुन दि. 02.12.2023 रोजी 06.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने बॅटरी बॉक्स मधुन पावर बॉस कंपनीचे 2 नग अंदाजे 30,000₹ किंमतीचे चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अब्दुल गफार गुलाम रसुल शेख यांनी दि.02.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-मोईन ईसाक शेख, वय 27 वर्षे,रा. जिजामाता नगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 4,80,000₹ किंमतीची ट्रक क्र एमएच 07 सी. 6391 लाल रंगाची ही दि. 27.10.2023 रोजी 19.45 ते दि. 27.10.2023 रोजी 23.00 वा. सु. धाराशिव ते लातुर जाणारे बायपास येथील निळृया रंगाच्या पत्रयाच्या शेडच्या जवळ रोडवर तुळजापूर शिवार येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मोईन शेख यांनी दि.02.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1) बालजी केरबा सरवदे, 2)धनराज केरबा सुरवसे, 3) बालाजी लिंबु उकरंडे, 4) धनराज केरबा सुरवसे, 5)विकास बिराजदार, सर्व रा. तुगांव ता. उमरगा जि. धाराशिव 6) शुभांगी कृष्णा खंदाळे आरोग्य नगरी उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.29.11.2023 रोजी 20.00 वा. सु. तुगांव ताप. उमरगा जि. धाराशिव येथे फिर्यादी नामे-कृष्णा दत्ता खंदाळे, वय 24 वर्षे, रा. रा. आरोग्य नगरी कानउे हॉस्पीटल जवळ उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने गैरकायद्याची मंडळी जमवून कौटुंबिक वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी सळई व काठीने डावे पायाचे घोटयावर मारुन गंभीर जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- कृष्णा खंदाळे यांनी दि.02.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 326, 324, 323, 504, 506, 342, 143, 144, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ रस्ता अपघात.”
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे : मयत नामे- सुनिल दत्तात्रय कुलकर्णी, वय 60 वर्षे, रा. समता नगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.18.11.2023 रोजी 20.30 वा. सु. गडपाटीचे पुढे राष्ट्रीय महामार्गावरुन एव्हरग्रीन मोटरसायकल वर बसून जात होते. दरम्यान अज्ञात लोडेड वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवुन सुनिल कुलकर्णी यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या आपघातात सुनिल कुलकर्णी हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- सुनिता सुनिल कुलकर्णी, वय 48 वर्षे, रा. समता कॉलनी धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.02.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह 134 (अ) (ब), मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे : आरोपी नामे- अतुल मारुती वाघमोडे, रा. अंबेजवळगा ता. जि. धाराशिव व सोबत मयत नामे- अनिता नवनाथ हाजगुडे, वय 45 वर्षे, रा. अंबेजवळगा ता. जि. धाराशिव हे दोघे दि.21.11.2023 रोजी 12.15 वा. सु. कौडगाव ते कौडगाव वस्तीच्या मध्ये असलेलृया स्मशानभुमी जवळुन मोटरसायकल क्र एमएच 25 एच. वाय 7556 वर बसून जात होते. दरम्यान आरोपी अतुल वाघमोडे यांनी त्याचे ताब्यातील वाहन हे भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवल्याने मयत नामे अनिता हाजगुडे या मोटरसायकल वरुन खाली पडून गंभीर जखमी होवून मयत झाल्या. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- प्रदीप नवनाथ हाजगुडे, वय 22 वर्षे रा. अंबेजवळगा ता. जि. धाराशिव यांनी दि.02.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
error: Content is protected !!