June 25, 2025

भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालयास वृक्ष मित्र पुरस्कार

  • कळंब – तालुक्यातील भाट शिरपुरा येथील भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालयास अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जिल्हा समिती सोलापूर यांच्या वतीने वृक्ष मित्र पुरस्कार व गौरव पत्र व ग्रंथ या शाळेचे मुख्याध्यापक सुरेश टेकाळे यांना धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे मानद अध्यक्ष व जेष्ठ शिक्षण तज्ञ एम.डी.देशमुख यांच्या हस्ते वृक्षमित्र पुरस्कार व ग्रंथ सोलापूर येथे देण्यात आला.
    यावेळी कार्यक्रमास अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डि.के.कुलकर्णी व अखिल भारतीय साने गुरुजी कथा मालेचे राष्ट्रीय कार्यवाह सुनील पुजारी उपस्थित होते. भाई नारायणराव लोमटे विद्या लयास वृक्षमित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सचिव बाळकृष्ण धस,जिल्हा सचिव अनंत सूर्यवंशी,सुनील पडघन, राहुल सोनवणे,सौ.रजनी गोडबोले,प्रेमचंद देवसाळे, दिलीपराव पाटील,डी.एस.भोसले, शाहूराव जाधव,शिवाजी आवारे, ए.टी. माने,डी.डी.शेरे,एस.वाय. जाधव,हनुमंत गायकवाड आदींनी अभिनंदन केले.
error: Content is protected !!