धाराशिव (जिमाका)– राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवार, १३ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या लोकअदालतीत मोटार वाहन अपघात प्रकरणे,कौटुंबिक प्रकरणे,वीज वितरण कंपनीशी संबंधित प्रकरणे,दिवाणी तसेच तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच बँका आणि वीज वितरण कंपन्यांची दाखलपूर्व प्रकरणे यांचा समावेश करण्यात येणार आहे.याशिवाय कौटुंबिक न्यायालय आणि ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रकरणे देखील तडजोडीसाठी या लोकअदालतीत ठेवण्यात येणार आहेत. लोकअदालतीमध्ये प्रकरण तडजोडीने मिटविल्यास संबंधित पक्षकाराला भरलेली न्यायालयीन फी परत मिळते,ही महत्वाची सुविधा उपलब्ध आहे.नागरिकांनी आपापसातील वाद समोपचाराने मिटवून वेळ,पैसा आणि मानसिक ताण-तणावाची बचत करावी,असे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय लोकअदालतीचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा न्या.श्रीमती अभिश्री देव आणि सचिव न्या.श्रीमती भाग्यश्री पाटील यांनी केले आहे. आपली प्रकरणे लोकअदालतीत ठेवण्यास इच्छुक नागरिकांनी जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,धाराशिव किंवा संबंधित तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा.अधिक माहितीसाठी ८५९१९०३६२५ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा dlsaosd25@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.तसेच प्रकरणे लोकअदालतीत ठेवण्यासाठी पक्षकारांनी आपल्या वकीलांशीही संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान