मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व सचिव डॉ.अशोक (दादा) मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र तसेच प्रशासनाची मूलभूत माहिती मिळावी,यासाठी ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी मंत्रीमंडळाची भव्य स्थापना करण्यात आली. या उद्घाटन सोहळ्यास मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे,नागरिकशास्त्र विद्यार्थी समूह प्रमुख प्रा. दिग्विजय पाटील,सहशिक्षक जनार्दन भामरे आणि प्रा.देवदत्त पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थी मंत्रीमंडळ स्थापन करण्याच्या उपक्रमात सहशिक्षिका श्रीमती नीता सोनवणे यांनी मोलाची भूमिका बजावली. मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की,विद्यार्थ्यांना शासनव्यवस्था आणि मंत्रिपदांची जबाबदारी समजावी,यासाठीच हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी प्राचार्य अविनाश मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या कामकाजाची थोडक्यात माहिती घेत सर्व नव्या मंत्रीमंडळ सदस्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी मंत्र्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली.
विद्यार्थी मंत्रीमंडळ – प्रधानमंत्री : आदिती मडके उपप्रधानमंत्री : आतिफ पठाण शिस्त मंत्री : श्रावणी सिरसट शिक्षण मंत्री : आल्फिया पठाण, फरीद शेख स्वच्छता मंत्री : समृध्दी लोकरे क्रिडा मंत्री : श्रीराज साळुंके पर्यावरण मंत्री : संकेत बागल अन्न मंत्री : शंकर सोनवणे,दिव्या कांबळे वाहतूक मंत्री : पायल सोनवणे प्रसार मंत्री : आतिफ पठाण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहशिक्षिका नीता सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.चंद्रशेखर गिरी यांनी केले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन