विकास कदम नगरसेवक होणारच,नागरिकांचा एकमुखी विश्वास!
कळंब – प्रभाग क्रमांक ४ मध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांना वेग आला असून, नागरिकांच्या पसंतीचे केंद्रबिंदू ठरत आहे ते विकास कदम हे नाव.गेल्या काही वर्षांपासून प्रभागातील सर्व पातळ्यांवर त्यांनी दाखवलेली उपस्थिती, विकासकामांवरील सखोल अभ्यास आणि नागरिकांच्या प्रश्नांबाबत दाखवलेला संवेदनशील दृष्टिकोन यामुळे प्रभागात एकच चर्चा सुरू आहे – “प्रभाग ४ चा पुढचा नगरसेवक म्हणजे फक्त विकास कदम!” अभ्यासू नेतृत्व – प्रभागाचा नवा चेहरा म्हणून ओळख निर्माण करणारे विकास कदम हे सुशिक्षित,शांत आणि तडफदार नेतृत्वाचे उत्तम मिश्रण मानले जातात. स्थानिक पातळीवरील कामांचे बारकावे,प्रभागातील प्राथमिक गरजा आणि भविष्यातील विकास आराखडा याबाबत त्यांचा सखोल अभ्यास आहे.नागरिकांच्या अडचणींना तत्काळ प्रतिसाद देण्याची त्यांची कार्यपद्धती विशेष उल्लेखनीय ठरली आहे.
त्यांच्या “समस्या नोंदवा – उपाय तत्काळ” या तत्त्वावर आधारित कार्यपद्धतीमुळे अनेक नागरिकांच्या छोट्या-मोठ्या अडचणींना दिलासा मिळाला आहे.तरुणाईचा उत्साह आणि ज्येष्ठांचा विश्वास या दोन शक्तींनी त्यांच्या नेतृत्वाला बळ दिले आहे. रोजगार,क्रीडा सुविधा,स्वच्छता, डिजिटल सुविधा आणि युवांसाठी उपक्रम यांसारख्या विषयांवर त्यांनी मांडलेल्या कल्पनांना तरुणांकडून विशेष प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग ४ मधील रस्ते, पाणीपुरवठा,सांडपाणी,स्वच्छता, लाईट व्यवस्था यांसारख्या अनेक मूलभूत मुद्द्यांवर कदम यांनी आधीच नियोजनबद्ध आराखडे तयार केले आहेत.गुणवत्तापूर्ण रस्ते,पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन,महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक ठिकाणे,युवांसाठी क्रीडा व कौशल्यविकास उपक्रम, ज्येष्ठांसाठी आरोग्य जनजागृती कार्यक्रम अशा उपक्रमांचा त्यांच्या विकास आराखड्यात समावेश आहे. नागरिकांच्या मते, “दृष्टिकोन आहे, अभ्यास आहे आणि लोकांशी जोडलेले व्यक्तिमत्त्व आहे – त्यामुळे बदल निश्चित!” असा एकमुखी विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये बदलाचे नेतृत्व म्हणून विकास कदम यांचे नाव आघाडीवर असून, त्यांच्या विजयाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास दिसून येतो.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड