राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष पूर्ण – विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागवणारा उपक्रम
कळंब – ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब येथे शुक्रवार दि.७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता सामूहिक गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कौशल्य,रोजगार,उद्योजकता व सांस्कृतिक कार्य विभाग,महाराष्ट्र शासन तसेच छत्रपती शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या प्रांगणात हा प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हनुमंत माने,समन्वयक प्रा.शशिकांत जाधवर,आयक्युएसी समन्वयक डॉ.अनिल जगताप,एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा.मनिषा कळसकर,प्रा.अभिमान ढाणे, तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘वंदे मातरम्’च्या गजरात परिसर दुमदुमून गेला आणि विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी