धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.06 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 165 कारवाया करुन 1,38,050 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
भुम पोलीस ठाणे:आरोपी नामे-नानीबाई संजय काळे, वय 38 वर्षे, रा.कल्याणनगर भुम ता. भुम जि. धाराशिव या दि.06.11.2025 रोजी 08.15 वा. सु भुम बसस्थानक समोर अंदाजे 2,300 ₹ किंमतीची 23 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-धनाजी बबन काळे, वय 28 वर्षे, रा.कल्याणनगर पारधी पिढी भुम ता.भुम जि.धाराशिव हे दि.06.11.2025 रोजी 08.50 वा. सु भुम बसस्थानक समोर अंदाजे 2,500 ₹ किंमतीची 25 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-सुनिता महादेव काळे, वय 38 वर्षे, रा.कल्याणनगर भुम ता. भुम जि. धाराशिव या दि.06.11.2025 रोजी 09.40 वा. सु भुम बसस्थानक समोर स्वच्दता गृहाचे बाजूस अंदाजे 2,200 ₹ किंमतीची 22 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-जनाबाई भागवत पवार, वय 45 वर्षे, रा.बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस भुम ता. भुम जि. धाराशिव या दि.06.11.2025 रोजी 10.30 वा. सु भुम बसस्थानक समोर मोकळ्या जागेत अंदाजे 1,800 ₹ किंमतीची 18 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-कमल अंबादास जाधव, वय 60 वर्षे, रा.गणेगाव भुम ता. भुम जि. धाराशिव या दि.06.11.2025 रोजी 19.40 वा. सु गणेगाव येथील बसस्थानकाच्या शेजारी अंदाजे 600 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये भुम पो ठाणे येथे स्वतंत्र 5 गुन्हे नोंदविले आहेत.
उमरगा पोलीस ठाणे:आरोपी नामे-हुसनय्या अमलय्या तेलंग, वय 65 वर्षे, रा.कदेर ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.06.11.2025 रोजी 15.00 वा. सु बालाजी पाटील यांचे शेतातील पत्र्याच्या शेड समोर कदेर येथे अंदाजे 1,500 ₹ किंमतीची 15 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
उमरगा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.06.11.2025 रोजी 13.10 ते 17.10 वा. सु. उमरगा पो ठाणे हद्दीत 4 ठिकाणी छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-बाळु व्यंकट तोरंबे, वय 40 वर्षे, रा.जकेकुर ता. उमरगा जि. धाराशिव 13.10 वा. सु. प्रभात हॉटेलच्या पाठीमागे उमरगा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 1,090 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-त्रिमुर्ती रघुनाथ शिंदे, वय 50 वर्षे, रा.मदनसुरी ता. निलंगा जि. लातुर 14.00 वा. सु. बसस्थानक उमरगा जवळील कनक लॉजचे बाजूस टाईम बाजार मटका जुगाराचे साहित्या एकुण 850 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-केदारनाथ आप्पाराव गायकवाड, वय 43 वर्षे, रा.औराद ता. उमरगा जि. धाराशिव 17.10 वा. सु. बाबु गायकवाड यांचे घराचे समोर औराद येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 640₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-खंडोबा तुकाराम बडोरे, वय 30 वर्षे, रा.कुन्हाळी ता. उमरगा जि. धाराशिव 16.40 वा. सु. कुन्हाळी येथील बस स्थानकाजवळ अंबुलगे यांचे पत्र्याचे शेड समोर कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 710 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 4 गुन्हे नोंदवले आहेत.
मुरुम पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान मुरुम पोलीसांनी दि.06.11.2025 रोजी 17.00 वा. सु. मुरुम पो ठाणे हद्दीत विजय वाले यांचे घरासमोर दाळींब येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-रज्जाक सरदार मुल्ला, वय 34 वर्षे, रा.दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव 17.00 वा. सु. विजय वाले यांचे घरासमोर दाळींब येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 1,180 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले मुरुम पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
कळंब पोलीस ठाणे: आरेापी नामे- दत्तात्रय श्रीकांत काटे, वय 36 वर्षे, रा. हिंगणगाव ता. कळंब जि. धाराशिव, संतोष मुरलीधर माने, वय 42 वर्षे, रा. इंदीरानगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव,गणेश प्रभाकर खापे, वय 42 वर्षे, रा. भाटशिरपुरा ता. कळंब जि. धाराशिव, बशीर शब्बीर शेख, वय 33 वर्षे, रा. जुने पोलीस स्टेशनजवळ कळंब ता. कळंब जि. धाराशिव, यांनी दि.06.11.2025 रोजी 13.30 ते 17.10 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एम 1115, ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एन 1194,ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एन 1161, महिंद्रा मॅक्स वाहन क्र एमएच 25 बी 0635 ही वाहने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, ते ढोकी जाणारे रोडवर, बंसत हॉटेल समोर रोडवर, देशमुख मेडीकल समोर व डिकसळ ते कळंब जाणारे रोडवर येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना कळंब पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285 मोवाका अन्वये कळंब पो.ठा. येथे स्वतंत्र 4 गुन्हे नोंदवले आहेत.
भुम पोलीस ठाणे: आरेापी नामे- विजय गोविंदराव मुजुळकर, वय 40 वर्षे, रा. इंदीरानगर भुम ता.भुम जि. धाराशिव यांनी दि.06.11.2025 रोजी 10.00 वा. सु. आपल्या ताब्यातील महिंन्द्रा मॅक्स कंपनीचे चार चाकी वाहन क्र एमएच 25 आर 0056 हे ओंकार चज्ञैक आलमप्रभु रोडवर पंचायत समितीचे कार्यालया समोर भुम येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना भुम पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285 मोवाका अन्वये भुम पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
“अवैध तंबाखु पानमसाला विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
तामलवाडी पोलीस ठाणे :आरोपी नामे-महादेव राजाराम हजारे, वय 37 वर्षे, रा.देवकुळी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.05.11.2025 रोजी 19.10 वा. सु.देवकुरुळी येथे आपल्या माळी हॉटेलच्या बाहेर पानटपरीत महाराष्ट्रात शासनाचे प्रतिबंधीत केलेला तत्सव पदार्थ डायरेक्टर स्पेशल पान मसाला, तंबाखु पॉकेट एकुण 900₹ किंमतीचे विक्री करीता जवळ बाळगलेला असताना तामलवाडी पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी गुटखा साहित्यासह जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द कलम- कलम 6 (अ),24 सिगारेट व इतर तंबाखु उत्पादन जाहितरातीस प्रति व वाणिज्य पुरवठा विनीमय अधिनियम 2003 अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
भुम पोलीस ठाणे :फिर्यादी नामे- महेश प्रमोद निलगार, वय 53 वर्षे, रा. संभाजी चौक भुम ता. भुम जि. धाराशिव ह.मु. आवंतीनगर जुना पुणे नाका सोलापुर यांचे संभाजी चौक भुम येथील बंद घराचे पाठीमागील दरवाज्याचे कुलूप आरोपी नामे- अशाके महादेव मैंदर्गे, बालाजी अरुण आकरे, रा. भुम ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 04.11.2025 रोजी 13.30 वा.पुर्वी तोडुन घरातील 34 गव्हाचे कट्टे, हरभऱ्याचे 2 कट्टे, घरातील जुनी भांडी, लोखंडी नांगराचे साहित्य, गॅस टाकी व शेगडी, असा एकुण 39,300₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महेश निलगार यांनी दि.06.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 305, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.तसेच फिर्यादीने दिलेल्या माहितीवरुन भुम पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपी नामे-अशाके महादेव मैंदर्गे, बालाजी अरुण आकरे, रा. भुम ता. भुम जि. धाराशिव यांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता नमुद आरोपींनी सदरचा गुन्हा गेल्याची कबुली दिली. पुढील तपास सुरु आहे.
“मारहाण.”
आनंदनगर पोलीस ठाणे :आरोपी नामे-ओमकारेश्वर देवेंद्र पाटील, स्वरुप सतिश खडके, आनंद सतिश खडके, रा. वाघोली, सुशिल सुनिल खडके, संपत तुकाराम खडके, सर्व रा. वाघोली ता. जि. धाराशिव यांनी दि.06.11.2025 रोजी 14.50 वा. सु. सुजल ट्रेडर्स समोर सांजार रोड धाराशिव येथे फिर्यादी नामे-अमर नानासाहेब खडके वय 42 वर्षे, रा. वाघोली ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून लोखंडी साखळी घेवून मॅनेजरला म्हणाला की, तुझ्या मालकाला बोलव याच साखळीने फाशी देतो त्याचे हातपाय तोडून याच साखळीने जिवे मारतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अमर खडके यांनी दि.06.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे आनंदनगर येथे भा.न्या.सं.कलम 189, 190, 351(2)(3), 352 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
तामलवाडी पोलीस ठाणे: आरोपी नामे- बबन किसन इटकर, रा. गांधीनगर बिड ता.जि.बिड व सोबत मयत नामे-रविंद्र कचरु उपाळकर, रा.गांधीनगर बिड ता.जि. बिड हे दोघे दि.21.09.2025 रोजी 23.30 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 23 बी.एल.8912 वरुन जात होते. दरम्यान माळुंब्रा गावाजवळ आरेापी नामे- बबन इटकर यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून मोटरसायकल स्लिप होवून अपघात झाला. या अपघातात रविंद्र उपाळकर हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सविता रविंद्र उपाळकर, वय 30 वर्षे, रा. गांधीनगर बिड ता.जि. बिड यांनी दि.06.11.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1), 125 (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“पळवुन नेणे.”
भुम पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-गोपीचंद शिवाजी दराडे, वय 35 वर्षे, रा. रामेश्वर ता. भुम जि. धाराशिव यांचा मुलगा नामे- आदित्य गोपीचंद दराडे, वय 15 वर्षे यास दि.05.11.2025 रोजी 18.00 वा. सु. रामेश्वर येथील शेतातील गोट्यावरुन अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फुस लावून पळवुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-गोपीचंद दराडे यांनी दि.06.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे भुम येथे भा.न्या.सं.कलम 137 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य