धाराशिव – केंद्र आणि राज्य सरकारच्या अपयशी धोरणामुळे सर्वत्र बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. त्यामुळे शेतकरी, कामगार आणि जनता त्रस्त झाली आहे. आर.पी.आय डेमोक्रॅटिक गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा विस्तार मोठ्या प्रमाणात केला आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक गटाचे प्रभारी महाराष्ट्र अध्यक्ष के. व्ही.गायकवाड यांनी दिली धाराशिव शहरातील मेघ मल्हार हॉल येथे शुक्रवार 7 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक गटाचे महाराष्ट्राचे प्रभारी अध्यक्ष के. व्ही गायकवाड, छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाध्यक्ष सचिन गंगावणे, छत्रपती संभाजी नगरचे जिल्हा सरचिटणीस विशाल नावकर, अनिल साळवे, संभाजी नगरचे शहराध्यक्ष महेश रगडे, तसेच राजाभाऊ राऊत, जिल्हाध्यक्ष राज धज उपस्थित होते. पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की,धाराशिव शहरामध्ये पदाधिकारी यांनी शहरातील विविध समस्या विषयी आंदोलने मागण्या करून समस्या सोडवल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकावर प्रत्यारोप करण्यामध्ये मग्न आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील विविध विकास कामांना स्थगिती मिळाली आहे. जिल्हाध्यक्ष राज धज मार्गदर्शन करताना म्हणाले की धाराशिव जिल्ह्यातील सर्व गट ,गण आणि प्रभागांमध्ये पक्षाच्या वतीने बैठका घेण्यात आले आहेत. सर्व इच्छुक उमेदवार निवडणुक संपूर्ण ताकदीने लढवणार आहेत. पक्षाच्या वतीने सर्व धर्मीय उमेदवारांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचेही धज यांनी सांगितले. या बैठकीस युवक जिल्हाध्यक्ष अनिल वाघमारे बांधकाम विभाग जिल्हाध्यक्ष संतोष धावारे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष हाफिज धालुज यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान