February 8, 2026

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात अभिवादन

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व सचिव डॉ.अशोकराव (दादा) मोहेकर यांच्या प्रेरणेने तसेच प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ६ नोव्हेंबर २०२७ रोजी ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांना अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
    या प्रसंगी प्राचार्य अविनाश मोरे यांच्या हस्ते मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास उच्च माध्यमिक विभाग प्रमुख सुनील साबळे, सहशिक्षक डी.बी.मडके,सूर्यकांत गुंगे,पालक तथा सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कसबे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    ज्ञान प्रसाराच्या परंपरेला मानवंदना देत गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
  • तसेच ज्ञान प्रसार प्राथमिक मध्येही शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी ( अण्णा ) यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
    यावेळी प्रशालेतील सहशिक्षक कमलाकर शेवाळे,चिलवंत राजाभाऊ ,धनंजय परजणे तसेच प्रशालेतील विद्यार्थी,विद्यार्थिनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!