May 13, 2026

शिराढोण व कळंब तालुक्यातील नागरिकांच्या मागणीला पाठबळ

  • शिराढोण –शिराढोणसह कळंब तालुक्यातील नागरिकांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय अनुदान (₹12,000/-) मिळण्यासाठी गटविकास अधिकारी कार्यालयात ठामपणे निवेदन दिले. स्थानिक ग्रामपंचायत सदस्य गणेश महाजन,जनार्दन महाजन व सुरेश महाजन यांच्या उपस्थितीत हा आग्रह करण्यात आला. नागरिकांना सांगण्यात आले की, शौचालय बांधकामाच्या पडताळणीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी घरी फोटो काढण्यासाठी येतील,अशावेळी नागरिकांनी सहकार्य करावे. जर कर्मचारी आले नसतील, तर ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा.
    स्वच्छ भारत मिशनच्या या योजनेत पात्र लाभार्थ्यांना शौचालय बांधणीसाठी ₹12,000/- अनुदान दिले जाते. या योजनेसाठी पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी व पारदर्शक असून,सरकारचा उद्देश प्रत्येक घरात स्वच्छता सुविधा पोहोचवण्याचा आहे​.
error: Content is protected !!