धाराशिव – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं,आज शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला असताना,त्याला केवळ खोटी आश्वासने आणि मदतीची नावे फसवणूक केली जात आहे,बोगस आकडे जाहीर केले जात आहेत, पण एक रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत नाही!” ठाकरे म्हणाले,”पक्ष बदलणारे, बाजार बसवे हे सरकार शेतकऱ्यांची कोणतीच मदत करणार नाहीत. सत्तेवर आल्यानंतर लोकांना तोंड दाखवता येईल असे काही केले नाही. जेव्हा मी सत्तेत होतो तेव्हा संकट काळात कर्जमाफी केली, शिवभोजन थाळी,आनंदाचा शिधा दिला.पण या सरकारने सगळी जनहिताची कामे बंद केली. अशा दगाबाजी करणाऱ्या सरकारला दगाबाजीनेच मारायला पाहिजे!” “सरकारने जाहीर केलेली ३१,८०० कोटींची मदत ही फक्त आकड्यापुरती आहे,प्रत्यक्षात जमिनीवर शेतकऱ्यांपर्यंत तुटपुंजी रक्कमही पोहचत नाही. शेतजमिनी उद्ध्वस्त झाल्या आहेत,पुढची तीन–पाच वर्ष त्यावर पीक घेता येणारच नाही. या संकटातही सरकार आणि मुख्य अधिकारी निव्वळ बाजारबुणगे, फोटो काढून राजकारण करत आहेत,”असा घणाघात त्यांनी केला. पुण्यातील महार वतनाची जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुत्राला दिल्याचा देखील त्यांनी जोरदार व निंदनीय उल्लेख केला आणि हा प्रकार थेट फसवणुकीचा असल्याचे ठणकावून सांगितले. शिवसेना नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आणि उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा सामोरासमोर ठाकरे यांच्याजवळ व्यक्त केल्या.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान