शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर प्रवेश!
कळंब – कळंब शहरात आज शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून,शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष सोडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा दि.२७ ऑक्टोबर २०२५ वार सोमवार रोजी कळंब येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयात पार पडला. या प्रसंगी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व आमदार कैलास दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहसीन दादा मिर्झा, शफीक बागवान,संदीप बिदादा, डॉ. साजेद चाऊस,जमील कुरेशी, धर्मेंद्र शहा,साबेर चाऊस,हमीद चाऊस,पवन वेदपाठक,उम्रान मिर्झा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमास तालुकाप्रमुख सचिन काळे,माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा,शहरप्रमुख विश्वजीत जाधव,सागर मुंडे,सुधीर भवर यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रवेशामुळे कळंब शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद अधिक वाढली असून,येणाऱ्या निवडणुकांमध्ये या पक्षाला नवचैतन्य प्राप्त होणार असल्याचे मत स्थानिक नेत्यांनी व्यक्त केले.
More Stories
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमणावर बुलडोझर;नगरपालिकेची धडक मोहीम सुरू
रॉकेल वाटपाचा मोठा निर्णय; आता एका रेशन कार्डवर ३ लिटरच मिळणार!
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी