संभाजी नगर – वंचित बहुजन आघाडी (VBA) ने २४ ऑक्टोबर रोजी क्रांती चौक ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) कार्यालय, औरंगाबाद दरम्यान आयोजित ‘जन आक्रोश मोर्चा’च्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस प्रशासनावर गंभीर कायदेशीर व नैतिक प्रश्न उपस्थित केले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात लेखी निवेदन सादर करून RSS ला मिळणाऱ्या कथित पोलीस संरक्षणाबाबत आणि सार्वजनिक संसाधनांच्या वापराबाबत अधिकृत स्पष्टीकरण मागितले आहे. आघाडीने पोलीस प्रशासनावर त्यांच्या शांततामय मोर्चाच्या मार्गात अडथळा निर्माण करण्याची शक्यता व्यक्त केली असून RSS कार्यालयाला सरकारी निधीतून संरक्षण पुरवले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. निवेदनात प्रशासनाकडे पाच मुद्द्यांवर लेखी उत्तरे मागण्यात आली आहेत.RSS ची वैधानिक नोंदणी आहे का? – नसल्यास अपंजीकृत संस्थेला सरकारी सुरक्षा का?,दसऱ्याच्या शस्त्रपूजेत प्रदर्शित होणारी शस्त्रास्त्रे कायदेशीर परवानाधारक आहेत का?,RSS कडे सैन्य श्रेणीतील किंवा प्रतिबंधित शस्त्रास्त्रांचा साठा आहे का?, गैर-सरकारी संस्थेला पोलीस संरक्षण देण्याचे धोरण काय आहे?,RSS कार्यालयाला सुरक्षा देण्यासाठी कोणते अधिकृत आदेश किंवा परिपत्रक जारी झाले आहे का? आघाडीने म्हटले आहे की,सामान्य नागरिकांच्या शांततामय निदर्शनांवर कठोर निर्बंध घालणारे प्रशासन अपंजीकृत संघटनेला करदात्यांच्या पैशातून सुरक्षा पुरवत असेल,तर हा लोकशाहीतील गंभीर प्रश्न आहे. वंचित बहुजन आघाडीने आपला मोर्चा पूर्णतः संविधानिक आणि शांततामय असेल असे स्पष्ट केले असून, अनुच्छेद १९(१)(अ) व १९(१)(ब) अंतर्गत मिळालेल्या मूलभूत अधिकारांच्या मर्यादेत हा मोर्चा काढला जाणार असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर,मोर्चाच्या एक दिवस आधीच पोलिसांवर झालेल्या या थेट आरोपांमुळे औरंगाबाद पोलीस प्रशासनाचे निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
More Stories
शेतकरी संघटन बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी किसान सभा सज्ज;१५ जानेवारीपर्यंत नवी रचना
धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी राजाभाऊ गायकवाड यांची पुनर्नियुक्ती
ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य मित्र उपक्रम- रुपाली चाकणकर