कळंब — येत्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक दिनांक २४ ऑक्टोबर २०२५,शुक्रवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार जनसंपर्क कार्यालय,कळंब येथे होणार आहे. बैठकीसाठी पक्षातील सर्व सेलचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष प्रा.श्रीधर (बाबा) भवर यांनी केले आहे. बैठकीचे दोन सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले आहे — 🔹 नगरपालिका निवडणुकीसंदर्भात: शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सकाळी ११ वाजता होणार. 🔹 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात: ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक दुपारी २ वाजता होईल. या बैठकीत आगामी निवडणूक रणनीती,उमेदवार निवड व संघटनात्मक तयारी यावर सविस्तर चर्चा होणार असल्याचेही समजते.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी