March 26, 2026

सतिश घोडेराव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड

  • धाराशिव — राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रांताध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेचे प्रांताध्यक्ष ॲड.वसंतराव मनकर यांनी किसान सभेच्या प्रदेश कार्यकारिणी व जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली.
    या जाहीर यादीत धाराशिव जिल्ह्याचे सतिश घोडेराव यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.त्यांच्या नियुक्तीचे वृत्त जाहीर होताच कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    या कार्यकारिणीत प्रदेश उपाध्यक्ष, सरचिटणीस,चिटणीस तसेच राज्यातील ३६ जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे.प्रांताध्यक्ष ॲड. वसंत मनकर यांनी सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून, “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज बुलंद करत केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे किसान सभेचे प्रमुख उद्दिष्ट आहे,” असे सांगितले.
    धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सतिश घोडेराव यांनी विश्वास व्यक्त केला की,शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्या प्रश्नांच्या तोडग्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारधारेनुसार कार्य करू.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली किसान सभेचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहू.”
    लवकरच या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र अजितदादा पवार,खा.सुनिल तटकरे,कृषी मंत्री ना.दत्ता मामा भरणे,आ.शिवाजीराव गर्जे आणि आ.डॉ.किरण लहामटे यांच्या शुभहस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात येणार आहे.
    सतिश घोडेराव यांच्या या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि शेतकरी बांधवांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
error: Content is protected !!